Breaking News

सिडकोच्या ढीसाळ नियोजनामुळे करंजाडेमध्ये पाणीसंकट

आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त
गेल्या अनेक दिवसांपासून सिडकोने वसविलेल्या विविध वसाहतींमध्ये पाण्याचा प्रश्न उद्भवला असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. करंजाडे वसाहतीमध्येदेखील 7 जूनपासून जवळपास 50 टक्के पाणीकपात करण्यात आली असून पाणीबाणी निर्माण झाली आहे. याबाबत भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 26) सकाळी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
7 जूनपासून सिडकोच्या करंजाडे वसाहतीमध्ये जवळपास 50 टक्के पाणीकपात करण्यात आली असून 15 एमएलडीवरून सद्य स्थितीत 7-8 एमएलडी सरासरी पाणीपुरवठा होत असल्याचे सरचिटणीस विनोद साबळे
यांनी सांगितले. पाणीकपातीमुळे नागरिकांची विशेषतः महिला वर्गाची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे या प्रश्नी आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष घालून समस्या  सोडविण्याची मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी भाजप शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे, युवा नेते अतिष साबळे, शहर उपाध्यक्ष सतिष पिंगळे, दिनेश धामनस्कर, प्रल्हाद कुंभार, पराग बने, पांडुरंग कांबळे, जयवंत भुजबळ, वैभव बांदे, वैभव सपकाळ, सुनील गुंड, वैभव गुरसळे व रहिवासी उपस्थित होते.
आज वरिष्ठ अधिकार्‍यांसह बैठक -आमदार प्रशांत ठाकूर
सदरच्या प्रश्नावर सविस्तर चर्चेसाठी सोमवारी (दि. 27) दुपारनंतर सिडको बेलापूर येथे वरिष्ठ अधिकार्‍यांशी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पनवेल परिसरातील सिडकोच्या वसाहतींमध्ये निर्माण झालेल्या पाणी प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करून याबाबत त्वरीत तोडगा काढण्याबाबत सांगणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सांगितले.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply