Breaking News

भारतीय हॉकी संघाकडून स्पेनचा धुव्वा

टोकियो ः वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार पुनरागमन केले आहे. भारताने स्पेनचा 3-0ने पराभव केला. सिमरनजीत सिंह आणि रूपिंदरपाल सिंहने केलेल्या गोल्समुळे भारताने विजय मिळवला. भारतीय संघाला आठव्या मिनिटाला पहिला गोल करण्याची संधी मिळाली होती, मात्र सिमरनजीतकडून ती संधी हुकली. यानंतर स्पेनने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली होती, पण भारतीय संघाने त्यांना रोखून धरले होते. अखेर 14व्या मिनिटाला सिमरनजीतने पहिला गोल करीत भारताचे खाते उघडले. भारताला पेनल्टी कॉर्नरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. रूपिंदर या वेळी मिळालेल्या संधीचा फायदा घेत दुसरा गोल केला आणि 2-0ने आघाडी घेतली. 24व्या मिनिटाला पीआर श्रीजेशला मैदानात बोलण्यात आले होते. हाफ टाइम होईपर्यंत भारत 2-0ने आघाडीवर होता. स्पेनकडून वारंवार आक्रमक खेळी करीत सामन्यात पुनरागम करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण भारतीय खेळाडूंनी संयमी खेळी करीत स्पेनला रोखले आणि विजयाची नोंद केली.

महिला संघाचा दुसरा पराभव

भारतीय महिला हॉकी संघांची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. ‘अ’ गटातील दुसर्‍या सामन्यात भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. जर्मनीने भारताला 2-0ने पराभूत केले. यापूर्वी पहिल्या सामन्यात नेदरलँडने भारताला 5-1ने पराभूत केले होते.

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply