Breaking News

महाड-मढेघाट-पुणे हा पर्यटन महामार्ग म्हणून विकसित करावा

भाजपचे महेश शिंदे यांची छत्रपती संभाजीराजेंकडे मागणी

महाड : प्रतिनिधी – महाड-मढेघाटमार्गे पुणे हा प्रलंबित मार्ग पर्यटन महामार्ग म्हणून विकसित करावा, तसेच महाड-रायगड महामार्गावरील गावांना जोडणार्‍या अ‍ॅप्रोच रोडची लांबी 50 वरून 100 मीटर करावी, अशी विनंती किल्ले रायगड विकास प्राधीकरणचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करावी, अशी मागणी भाजपचे महाड तालुका सरचिटणीस महेश शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

महाड तालुक्यासह पोलादपूर, खेड, मंडणगड, दापोलीस कोकणाला जोडणारा सर्वात कमी लांबीचा प्रलंबित असलेला महाड-मढेघाट-वेल्हे-पाबेघाट-खानापूरमार्गे पुणे हा मार्ग स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड, चवदार तळे, शिवथरघळ, किल्ले तोरणा, किल्ले राजगड, सिंहगड, पानशेत-खडकवासला आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या पर्यटन व तीर्थस्थळांना जोडणारा आहे. त्यामुळे या मार्गाचा गडकिल्ले जोडणारा पर्यटन महामार्ग म्हणून विकास करावा, अशी मागणी महेश शिंदे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे केली आणि ही बाब राजेंनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. या महामार्गामुळे या भागाचा पर्यटन आणि औद्योगिकदृष्ट्या विकास होणार आहे, तसेच महाड-पुणे हे अंतर अवघ्या 96 किमीवर येईल.

ना. नितीन गडकरींचे स्वप्न असलेल्या महाड-रायगड मार्गाचे रखडलेले काम जलदगतीने सुरू करुन या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म गाव आंबडवडे या महामार्गावर असणार्‍या गावांना जोडणार्‍या अ‍ॅप्रोच रोडची लांबी 50ऐवजी 100 मीटर करावी, अशीदेखील मागणी शिंदे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे केली आहे. या मागणीला राजेंनी सकारात्मक उत्तर दिले असून, ना. गडकरी यांच्यापर्यंत हा विषय नेणार असल्याचे अश्वासन त्यांनी या वेळी दिले. शिंदे यांच्यासोबत भाजपचे तालुका उपाध्यक्ष चंद्रजित पालांडे, चिटणीस शैलेश बुटाला उपस्थित होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply