Breaking News

कोरोना रुग्णांसाठी ‘दिशा’दूत; नातेवाइकांना हॉस्पिटलमधील बेड्सबाबत माहिती देण्याचा उपक्रम

पनवेल : वार्ताहर

कोरोनाच्या दुसर्‍याला लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे बेड उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे. ऑक्सिजन अतिदक्षता विभाग, त्याचबरोबर व्हेंटिलेटर याच्या शोधार्थ नातेवाइकांना वणवण करावी लागते. त्यांची गैरसोय दूर व्हावी म्हणून त्यांना बेडबाबत माहिती उपलब्ध व्हावी, तसेच रुग्णालयाचे संपर्क क्रमांक मिळावेत या उद्देशाने कामोठे येथील दिशा मंचच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. दिशाने त्यासाठी आपली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम केले जात आहे. या माध्यमातून इतर सामाजिक संस्थांसोबत एक प्रकारे वस्तुपाठ ठेवला जात आहे. कामोठे वसाहत कोरोना हॉटस्पॉट बनली आहे. आणि या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त असल्याने त्यांना उपचारार्थ कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे. त्याचबरोबर तेथे ऑक्सिजन बेड उपलब्ध होईल का, एचआरसिटी स्कोर जास्त असल्यास त्याचबरोबर ऑक्सिजनची पातळी खाली आल्यास तेथे अतिदक्षता विभागामध्ये जागा मिळेल का? प्रकृती गंभीर असल्यास व्हेंटिलेटर उपलब्ध होईल का यासारख्या अनेक अडचणींना रुग्णांच्या नातेवाईकांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर कामोठे येथील दिशा महिला मंचने या रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळावा. त्यांना त्वरित बेड उपलब्ध व्हावेत या अनुषंगाने स्वतंत्र यंत्रणा निर्माण केले आहे. त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाशी समन्वय साधण्यासाठी त्यांच्याकडून सर्व माहिती संकलित करण्याच्या अनुषंगाने एक स्वतंत्र टीम तयार केले आहे. यामधील महिला सदस्य रुग्णालयात संपर्क करून त्याठिकाणी किती बेड उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ऑक्सिजन आणि आयसीयूची काय स्थिती आहे. व्हेंटिलेटर त्या ठिकाणी आहे का याची माहिती संकलित करून ती समाज माध्यमांवर शेअर केली जात आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या नातेवाइकांपर्यंत पोचवली जात आहे. रुग्णालयाचा संपर्क क्रमांक दिल्याने त्याठिकाणी त्वरित संपर्क करून रुग्णांना बेड उपलब्ध होत आहे. कोरोना वैश्विक संकटाच्या काळामध्ये या सावित्रीच्या लेकींकडून खर्‍या अर्थाने सर्वसामान्यांना दिलासा दिला जात आहे. दिशा व्यासपीठाच्या संस्थापिका निलम आंधळे व उपाध्यक्ष विद्या मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली या हिरकणी स्वयंस्फूर्तीने काम करीत आहेत.

या आहेत ‘दिशा’च्या हिरकणी!

दिपा खरात-एमजीएम हॉस्पिटल

रुपाली बरोटे-लाइफ  इरा हॉस्पिटल, माने हॉस्पिटल

शमिका जाधव-ऑर्चिड हॉस्पिटल, न्यू पल्स हॉस्पिटल

भावना सरदेसाई-सनराईस हॉस्पिटल

रिना पॅवार, मेट्रोकेअर हॉस्पिटल, क्रिटीकेअर हॉस्पिटल

गीतांजली कांबळे-नोबल केअर हॉस्पिटल

कामोठे वसाहतीतील कोविड रुग्णालयाशी समन्वय साधून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बेडची माहिती संकलीत करायची आणि ती रुग्णांच्या नातेवाइकांना पर्यंत पोहचवायची हे काम सध्या दिशा व्यासपीठ करीत आहे. आमच्या सर्व हिरकनी स्वयंस्फूर्तीने हे कार्य करीत आहेत. त्यातून आम्हाला मानसिक समाधान मिळते. शेकडो रुग्णांना दिशा छोटीशी का होईना मदत करते  याचा मनोमन सर्वांना आनंद आहे.

-निलम आंधळे, संस्थापिका, दिशा महिला मंच

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply