Breaking News

उरण तालुक्यात वीज-पावसाचा खेळ

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यात मागील 15 दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाऊस आणि वादळ येताच वीज गायब होते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अडचणी येत आहेत.

त्याचप्रमाणे सायंकाळी दिवाबत्तीच्या व पहाटेच्या सुमारासही दोन-दोन तास वीजपुरवठा खंडित केला जातो. यामुळे अनेकांना याचा फटका बसत आहे. सतत सायंकाळच्या सुमारास वीज गायब झाल्याने आणि वीजपुरवठा कमी-जास्त होत असल्याने अनेकांच्या घरातील विजेच्या उपकरणांचे नुकसान होत आहे. या गायब होणार्‍या विजेचा फटका गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान बालके, विद्यार्थी, कर्मचारी आणि व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. एका बाजूला मुसळधार पाऊस होत असल्याने शहरात काही ठिकाणी पाणीही साचले होते. एका बाजूला वीज नाही आणि दुसर्‍या बाजूला पाणीच पाणी या दोन्हींमुळे उरणकर कातावले होते. त्यामुळे गेल्या 15 दिवसांत उरणकरांना बर्‍यापैकी मनस्ताप सहन करावा लागला.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply