खोपोली : प्रतिनिधी
शहरात सुमारे 195धोकादायक घरे व इमारती असून, तेथील रहिवाशांना खोपोली नगर परिषदेने नोटिसा बजावल्या आहेत. धोकादायक घरे किंवा इमारतीचा जीर्ण भाग काढून टाकावा, असे या नोटीसीत म्हटले आहे. खोपोली नगर परिषदेकडून झालेल्या सर्वेक्षण नुसार नगर परिषद हद्दीत सुमारे 160घरे व 35च्या आसपास रहिवासी इमारतीचा काही भाग जीर्ण व धोकादायक झाला आहे. या सर्वांना नगर परिषदेकडून कडून नोटीस बजावून धोकेदायक घरे किंवा इमारतीचा जीर्ण भाग काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. संबंधितांनी असे न केल्यास व भविष्यात कोणतीही दुर्घटना किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याला जबाबदार अशा घर मालकांची असणार आहे. जबाबदारी कोणाची? शहरातील जीर्ण घरे व रहिवासी इमारतींना नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र नगर परिषदेच्या मालकीच्या काही वास्तू, मध्यवर्ती भाजीमार्केट या इमारती अतिशय जीर्ण व धोकादायक आहेत, याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न खोपोलीत सध्या चर्चेचा विषय झाला आहे. यासंबंधी नगर परिषदेकडे चौकशी केली असता, शहरातील भाजीपाला मार्केटच्या ठिकाणी लवकरच अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त भाजीमार्केट निर्मिती होईल. तसा ठराव झाला आहे, असे सांगण्यात आले.