Breaking News

पनवेल मनपा कार्यालयात प्रवेशासाठी नियमावली जाहीर

पनवेल : प्रतिनिधी

वाढत्या कोरोनारुग्णांमुळे पनवेल महापालिका कार्यालयात येणार्‍या सर्व नागरिकांना आणि कर्मचार्‍यांसाठी सुरक्षेचे नियम अधिक सक्त करण्यात आले आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, या प्राथमिक गोष्टीचे सर्वांनी पालन  करण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. महापालिका कार्यालयामध्ये पाणी बिल, विवाह नोंदणी, तसेच अनेक कामानिमित्त नागरिकांची गर्दी होत असते. यापुढे पालिका कार्यालयात येणार्‍या नागरिकांनी आणि कर्मचार्‍यांनी मास्क परिधान करणे बंधनकारक असणार आहे. तसेच सुरक्षा रक्षकांनी प्रत्येकाचे तापमान तपासणे, प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझर देणे, बंधनकारक केले आहे. पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित कार्यालयात प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली. तसेच प्रत्येक व्यक्तीचे स्कॅनिंग केल्याशिवाय कार्यालयाच्या इमारतीमध्ये प्रवेश निषिध्द करण्यात आला आहे. या नियमांची सक्त अंमलबजावणी करण्याचे आदेश उपायुक्त विठ्ठल डाके यांनी सर्व सुरक्षा रक्षकांना दिले आहे. कोराना साथरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे  दिसू लागल्याने आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नुकतीच नियमावली जाहीर केली आहे. या नियमांप्रमाणे महापालिका कार्यालयात विना मास्क येणार्‍यांवर 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply