Tuesday , March 28 2023
Breaking News

उरण मार्गावर एनएमएमटीच्या गळक्या बसेस

उरण ः वाशी बेलापूर घनसोली, कोपरखैरने आदी नवी मुंबईतील भागात जाण्यासाठी प्रवासी वर्गाची पहिली पसंती ही नवी मुंबई महापलिकेच्या बसेस सेवेला आहे. एनएनएमटीचा प्रवास हा सर्वात सुरक्षित व सोयीस्कर प्रवास समजला जातो. मात्र ऐन पावसाळ्यात उरण मार्गावर एनएनएमटीच्या गळक्या बसेस सुरु असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. उरण मार्गावर धावणार्‍या एनएनएमटीच्या बसेसमध्ये पावसाचे पाणी खिडकीतून, दरवाजातून तसेच डोक्यावरील पत्र्यातून बसमध्ये बसलेल्या प्रवासी वर्गाच्या अंगावर पावसाचे पाणी पडत आहे. अनेकांना यामुळे सर्दी फडसे, तापाची लागण झाली असून प्रवासी वर्गाचे आरोग्यही धोक्यात आले आहे. कामावर जाताना कर्मचारी वर्गाला भिजलेले अंग, कपड़े घेऊन कामावर जावे लागत आहे . एमएच 5268, एमएच 43 एच 5161 या बसेमधून पाणी गळत असल्याचे प्रवाशांनी अनेकदा अनुभवले आहे. प्रशासनाने कोणत्याही गळक्या बसेस उरण मार्गावर पाठवू नयेत, तसेच गळक्या बसेसची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

उरण पालिकेत हिरकणी कक्ष

उरण : उरण नगरपरिषद कार्यालयामध्ये बाळासह येणार्‍या स्तनदा मातांना बाळाला स्तनपान करण्यासाठी नगरपरिषद कार्यालयातील जुन्या संगणक कक्षामध्ये  गुरुवार (दि. 11) हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या प्रसंगी उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी ,मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरसेवक कौशिक शहा, महिला बालकल्याण व स्वास्थ समिती सभापती आशा शेलार, उपसभापती स्नेहल कासारे, नगरसेविका प्रियंका पाटील, दमयंती म्हात्रे, जानव्ही पंडीत, रजनी कोळी, यास्मिन गॅस, शिक्षण मंडळ सभापती रवी भोईर, पाणी पुरवठा सभापती राजेश ठाकूर यांच्यासह सर्व नगरसेवक व संजय पवार यादी उपस्थित होते.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply