Tuesday , March 28 2023
Breaking News

बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले दर्शन

पनवेल ः बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पूजा केली व दर्शन घेतले. (छाया ः लक्ष्मण ठाकूर)

नवीन पनवेल ः गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नवीन पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका सुशिला घरत, प्रशांत फुलपगार, जगदीश घरत, विजय म्हात्रे, विनोद वाघमारे आणि विभागातील महिला यांनी अधिकारी श्री. वाड यांची भेट घेतली आणि सोमवारपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही; तर सोमवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

पनवेल ः श्री श्री जगन्नाथ संस्कृतिक सेवा ट्रस्ट यांच्या वतीने आपली भारतीय संस्कृती जपत कालिकामाता मंदिरापासून रथयात्रेचे नियोजन करण्यात आले होते. या रथयात्रेनिमत्त प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. रथयात्रेनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन अ‍ॅड. भुजबळ यांनी सेवा केली.

खोपटे ः  डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्री बैठक खोपटे यांच्यामार्फत कोप्रोली, खोपटेतील विद्यार्थ्यांना साहित्यवाटप करण्यात आले. या वेळी खोपटे सरपंच विशाखा ठाकूर, उपसरपंच सुजीत म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, हसुराम घरत उपस्थित होते.

Check Also

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून …

Leave a Reply