Breaking News

अलिबागेत भरवस्तीत भंगार गोदामाला आग

अलिबाग : प्रतिनिधी

शहरातील जुन्या मासळी बाजाराच्या मागील बाजूस असलेल्या भंगाराच्या गोदामाला गुरुवारी रात्री आग लागली. अग्निशमन दलाने अडीच तासांच्या महत्प्रयासाने या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी भरवस्तीतील अनधिकृत भंगार गोदामांचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.

घराशेजारीच मोकळ्या जागेला गोदामाचे स्वरूप देण्यात आले होते. आग लागल्याचे समजताच घरातील सर्व माणसे बाहेर पडली. अलिबाग नगर परिषदेचे दोन व आरसीएफ कंपनीचा एक असे तीन अग्निशमन बंब अडीच तास आगीशी झुंजत होते. स्थानिक नागरिकांचाही आग विझवण्याच्या कामात मोठा सहभाग होता. आग विझवण्याचे काम सुरू असताना अग्निरोधक बॉल्सचा वापर केला जात असल्याने अधूनमधून छोटे स्फोट होत होते. त्यामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती. या भंगाराच्या गोदामात ज्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या त्यामध्ये काही प्रमाणात रसायन होते, असा अंदाज बांधला जात आहे. दरम्यानच्या काळात या भागातील वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला होता.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply