उरण : प्रतिनिधी
खारपाटील बंधूंनी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे हाती घेतलेले कार्य अतिशय चांगले असून ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे असून, समाजाला प्रेरणा देणारे असेच आहे, असे गौरवोद्गार लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी चिरनेर येथे काढले. नामांकित उद्योगपती पी. पी. खारपाटील यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम धाकू खारपाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा भूमिपूजन सोहळा नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता.
या निमित्ताने पी.पी. खारपाटील यांचा जीवन प्रवास उलगडणार्या ’पांडुरंग वारी’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच नियोजित भूमिपूजन रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते आपल्याला उद्घाटनपर भाषणात बोलत होते. या वेळी उत्सवमूर्ती पी.पी. खारपाटील यांचा 70 वा. वाढदिवस 70 दिव्यांची ओवाळणी करून व केक कापून साजरा करण्यात आला. तसेच या वेळी पी.पी. खारपाटील यांचा जीवनपट उलगडणार्या पांडुरंग वारी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यापुढे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पी.पी. खारपाटील यांनी माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज आणि आता ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षणाची गंगोत्री आणली. त्यांनी टाकलेले हे पुढचे पाऊल कौतुकास्पद आहे. मी स्वतः तसेच जे. एम. म्हात्रे आणि पी.पी.खारपाटील उद्योग क्षेत्रात आहोत. त्रिमूर्ती म्हणून निवेदकाने आमचा उल्लेख केला.
आमची या उद्योग क्षेत्रात चढाओढ अशी नाही. किंवा स्पर्धा नाही. असे सांगून, मी माझ्या आईच्या नावाने पनवेल येथे लॉ कॉलेज काढले आहे. बॅरिस्टर ए आर.अंतुले, अॅड. दत्ता पाटील, लोकनेते दि.बा. पाटील यांच्या हस्ते त्यावेळी लॉ कॉलेजचे उद्घाटन झाले. ग्रामीण विद्यार्थ्यांना लॉ कॉलेजचा फायदा झाला. इंग्रजी माध्यमाच्याही शाळा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपली पुढची पिढी शिक्षणात सक्षम व्हावी यासाठी दर्जेदार आणि अपेक्षित शिक्षणाची गरज आहे. खारपाटील करीत असलेले कार्य हे प्रेरणादायी असेच आहे. आपला बहुजन समाज आता मागे राहिलेला नाही. तर तो सर्व क्षेत्रात पुढे येत आहे. मी 2021 ला रिटायर झालो. आता शैक्षणिक कामात जास्त लक्ष घातले असून, शैक्षणिक क्षेत्रात दिशा देण्याचे काम मी आता करीत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी सांगितले की, चिरनेरचे राजकारण फार वेगळं आहे. हे लोक विकास कामासाठी राजकारणाच्या चपला बाहेर ठेवून एकत्र येतात. ही गोष्ट चिरनेर गावाच्या विकासासाठी मोठी आहे. त्यामुळे चिरनेरचा विकास झालेला दिसून येतो. कार्यक्रमावेळी उद्योगपती पी.पी. खारपाटील यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन, त्यांचे अभिष्टचिंतन केले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उरणचे आमदार महेश बालदी, माजी नागराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, अॅड.प्रविण ठाकूर, विनोद चव्हाण चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल, हेमंत पाटील, संतोष ठाकूर, सुरेश पाटील, माधुरी गोसावी, वर्षा खारपाटील, उद्योजक राजाशेठ खारपाटील, सुनीता खारपाटील, सहाय्यक पोलीस अधिकारी विनोद चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष परिक्षित ठाकूर, पोलीस सहाय्यक आयुक्त किशोर गायके, अमित भुजबळ, वपोनि जितेंद्र मिसाळ, सीमा घरत, मेघनाथ तांडेल, सत्यवान भगत, रविशेठ पाटील, सरपंच किर्तीनिधी ठाकूर, प्रकाश ठाकूर, सरपंच अजित पाटील, सुरेश पाटील, माजी सरपंच विलास पाटील, समीर मढवी, रमाकांत पाटील, तहसीलदार डॉ. उध्दव कदम, सार्वजनिक बांधकाम विभाग उरण उप अभियंता नरेश पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, डॉ युवराज पाटील, डि के पाटील, माजी सरपंच बबन गोंधळी, प्राचार्य सुप्रिया म्हात्रे, माजी सरपंच वसंत चिर्लेकर, उद्योजक देवेंद्र पाटील आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत राजेंद्र खारपाटील, समीर खारपाटील व सागर खारपाटील यांनी केले.
Check Also
नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …
RamPrahar – The Panvel Daily Paper