Breaking News

कोकणाला अच्छे दिन

मोदी सरकार केंद्रामध्ये दुसर्‍यांदा सत्तेवर आले आहे. महाराष्ट्रातही भाजपचे सरकार आले आणि पुन्हा एकदा पाच वर्षांच्या यशस्वितेनंतर निवडणुकीला सामोरे जात आहे. विठ्ठलाची पूजा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढचा मुख्यमंत्रीही मीच असेन, असे आत्मविश्वासाने सांगितले. सरकारने केलेल्या कामाबद्दल त्यांना विश्वास आहे. सबका विकास हे ध्येय सरकारने समोर ठेवले. कोकणालाही यामुळे अच्छे दिन दिसू लागले आहेत

देशात 2014 मध्ये मोदी सरकार आले. अच्छे दिन येतील म्हणून देशवासीयांनी भाजपाला संधी दिली आणि खरोखरच काहीतरी वेगळे घडले. देशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत धाडसी निर्णय या सरकारने घेतले. लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्र विधानसभेतही भाजप सरकार आले. पाच वर्षात केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने कोकणाला भरभरून दिले आहे. गेल्या पाच वर्षातील कोकणातील मोठे प्रकल्प पाहिले, तर नक्कीच कोकणासाठी आता अच्छे दिन दूर नाहीत असे चित्र आहे. काँग्रेसच्या काळात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षे रखडले होते. भाजप सरकारच्या काळात या कामाला गती मिळाली. पूल उभे राहिले, काम वेगाने सुरू आहे. कोकणचा कॅलिफोर्निया करायचा असेल, तर आधी दळणवळण, भौतिक सुविधा याकडे लक्ष द्यायला हवे व सरकारची त्यादृष्टीने  पावले पडत आहेत, हे कोकणवासीयांसाठी आशादायी आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होत आहे. कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभु यांना मोदींनी भाजपत घेतले व त्यांच्याकडे रेल्वेमंत्रीपद दिले. अभ्यासू प्रभूंना कोकण रेल्वेला प्रगतिपथावर आणले. दुपदरीकरणाबरोबरच आता कोरेचे विद्युतीकरणही होत आहे. दुपदरीकरण आणि विद्युतीकरणामुळे कोरेला अधिक गती मिळेल, पर्यायाने चाकरमान्यांचा प्रवास सुखकारक होईल. रेल्वेस्थानकावर केवळ दाक्षिणात्य खाद्य दिसायचे, आता कोकणातील उत्पादनांचे स्टॉल्सही सुरू झाले आहेत. तिकीट बुकिंग सोईस्कर होण्याकरिता आरक्षण केंद्रांची संख्याही वाढणार आहे. चिपळूण-कर्‍हाड, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग उभारण्याचा प्रस्तावही असून, त्यामुळे कोकण पश्चिम महाराष्ट्राशी रेल्वेने जोडले जाणार आहे. व्यापार उदिमातही वाढ होणार आहे. कोकण रेल्वेने पश्चिम महाराष्ट्राशी जोडले गेले, तर कोकणची आर्थिक प्रगती व्हायलाही फारसा वेळ लागणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सागरी महामार्गाचीही संकल्पना पुढे आणली आहे. हा जलमार्ग झाल्यास ही वाहतूक खूपच स्वस्त असणार आहे. दळणवळणांचे जाळे विणण्यासोबतच सरकारने कोकणात मोठ मोठे प्रकल्प आणण्यास पुढाकार घेतला आहे. अणुऊर्जा, रिफायनरी असे प्रकल्पही प्रस्तावित आहेत. कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे. आता केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार कोकणाला भरभरून देत आहेत. मोठे प्रकल्प, दळणवळण यातून विकासाचे एक मोठे जाळे विणले जात आहे, कोकणातील पर्यटन वाढीसाठी अनेक योजना सरकारकडून राबविल्या जात आहेत, कृषी पर्यटनावर भर दिला जात आहे व यातूनच कोकणवासीयांचे अच्छे दिनचे स्वप्न सत्यात येऊ पाहत आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, विद्युतीकरण, महामार्गाचे चौपदरीकरण, जलमार्ग हे कोकण विकासाचे मार्ग ठरतील.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply