Breaking News

लाकडाने मारहाण, एक जखमी

पनवेल ः जय मल्हार हॉटेलसमोर उभे केलेली शेड काढत असताना संग्राम भोपी याने ताई तुकाराम ढोकळ (वय 60) या महिलेला लाकडाच्या सहाय्याने मारहाण केली. शहर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरढोण येथील ताई तुकाराम ढोकळ शिरढोण गावचे बस स्टॉपजवळ जय मल्हार हॉटेलसमोर जागा आहे. या ठिकाणी गावातील संग्राम नारायण भोपी यांनी ताई यांच्या जागेत कच्चे शेड उभे केले होते. त्याबाबत त्यांचे पती तुकाराम ढोकळ, दीर कान्हु कमळू ढोकळ आणि त्यांचा मुलगा विक्रम तुकाराम ढोकळ हे त्यांच्या जागेमध्ये उभे केलेले शेड सोडवित असताना त्या ठिकाणी संग्राम भोपी, त्याची आई लक्ष्मी भोपी व विश्वजित भोपी हे आले व त्यांनी ताई यांच्या पतीला व मुलांना शिविगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी त्यांचे भांडण सोडविण्यास ताई ढोकळ गेल्या असता संग्राम नारायण भोपी याने ताई यांच्या डाव्या पायावर लाकडाची उपट मारून दुखापत केली. शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उरण येथे संततधार कार्यक्रम

उरण ः समाजाच्या सुख-समृद्धीकरिता ब्राह्मण सभातर्फे प्रती वर्षाप्रमाणे श्री गणपतीवर अखंड 24 तास संततधार कार्यक्रम शनिवार (दि. 13) सकाळी 6 वाजल्यापासून रविवार (दि. 14) रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत अखंड 24 तास अथर्वशीर्ष पठण श्री गणपती मंदिर, गणपती चौक उरण येथे करण्यात आले. या कार्यक्रमात श्रीधर मोहोळकर, चंद्रकांत राईलकर, महेश उपाध्ये, प्रभाकर दाते, हेमंत धामणकर, नरेंद्र उपाध्ये, विश्वास पटवर्धन, हनुमंत वासुदेव आर्य, वैभव राई लकर, चंद्रकांत साठे, नितेश उपाध्ये, नितीन भान्जी, गणेश वत्सराज, जयेश वत्सराज, अलका साठे व अध्यक्ष व सचिव ब्राह्मण सभा महिला शाखा कार्यकारिणी, ब्राह्मण सभा अध्यक्ष कार्यकारी मंडळ यादींचे सहकार्य मिळाले. सायंकाळी 4 ते 6 पर्यंत ब्राह्मण सभा महिला शाखा कार्यकारी मंडळ यांनी अथर्वशीर्ष केले.

द्वारकाधीश मंदिरात गुरुपौर्णिमा

पनवेल : मंगळवार, दि. 16 जुलै रोजी साईहरिक्षेत्र आपटा फाटा येथील श्री द्वारकाधीश मंदिर, श्री स्वामी समर्थ, मृण्मयी मठी आणि गुरुमंदिर येथे गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8.30 ते 10.00 दरम्यान गीता व गुरुगीता पठण, तसेच प.पू. लीलाताई कर्वे यांच्या समाधीस अभिषेक व पूजन, दुपारी 10.15 ते 11.30 भगवान द्वारकाधीशांच्या पादुकांवर श्रीविष्णूसहस्त्रनाम घोषात अभिषेक व पूजन, दुपारी 12.00 ते 1.30 आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच साईहरिक्षेत्रातील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे लघुरूद्राभिषेक, तसेच श्री स्वामी समर्थ पादुका व प. पू. नाना महाराजांच्या पादुका यावर अभिषेक व पूजन सकाळी 7 ते 9 या वेळात होईल. प. पू. कृष्णसरस्वती महाराज व प. पू. श्री नामदेव महाराज यांच्या पादुकांवर अभिषेक व पूजन सकाळी 9 ते 10 या वेळात होईल. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

राजयोगामुळे मनोबल वाढते

उरण ः राजयोगामुळे अनेक फायदे होतात. त्यात मनोबल वाढते, मनशांती, मनोरोग कमी होतात. तणावमुक्त जीवन होते, दिव्य गुणांची धारणा होते, आरोग्यशक्ती वाढते, व्यसनमुक्ती होते, कर्मात श्रेष्ठता येते, तणावमुक्त जीवन होऊन मानसिक शांती मिळते, एकाग्रता वाढते, असे विविध फायदे राजयोगामुळे होतात. म्हणून प्रत्येकाने नियमितपणे राजयोग करणे जरुरीचे आहे. ही काळाची गरज आहे, असे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पनवेल शाखेच्या तारा दीदी यांनी उरण येथे केंद्राचे उद्घाटन करताना सांगितले. या वेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पनवेल शाखेच्या प्रमुख तारा दीदी, उरण शाखेच्या डिम्पल सेवक, डॉ. बी. व्ही. देवणीकर, सुनील चौधरी, संजय भाई व इतर भाई व बहेन उपस्थित होते. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय उरण येथील शाखा नवीन जागेत स्थलांतरीत करण्यात आली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply