Breaking News

द्रोणागिरी हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धेसह शार्क संवर्धन दिन साजरा

करंजा : रामप्रहर वृत्त

द्रोणागिरी हायस्कूल करंजा येथे रविवारी (दि. 14) जागतिक शार्क संवर्धन दिनानिमित्त वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेने संरक्षित सागरी जीव बचाव करण्यासाठी कार्यशाळेचे व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या वेळी सागरी जीव संशोधन करणारे स्वप्नील तांडेल यांनी शार्क माशांच्या संवर्धनासाठी मार्गदर्शन केले. या वेळी शार्क माशांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन सीताराम नाखवा, उपसरपंच प्रदीप कोळी, मच्छीमार बचाव समितीचे अध्यक्ष हेमंत गैरीकर, करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन शिवदास नाखवा, गणेश नाखवा, सदानंद नाखवा, बाळकृष्ण कोळी आदी मान्यवर शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रदीप पाताडे, निखिल साठे, अदिती ठाकूर, गौरी घरत यांनी मेहनत घेतली, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. म्हात्रे यांनी केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply