Breaking News

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

सासरच्या चौघांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कर्जत : बातमीदार

हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणार्‍या बीड येथील पती, सासू, सासरे आणि दिराविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जत शहरातील बीएमएसपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणीचा 20 नोव्हेंबर 2017 मध्ये बीड जिल्ह्यातील विशाल जायभाये  या तरुणबरोबर विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसांतच पती विशाल तसेच सासू, सासरे आणि दिर यांनी सतत हुंड्याची रक्कम मिळावी म्हणून विवाहितेकडे तगादा लावला. त्यानंतर विवाहितेला शारीरिक आणि मानसिक त्रास देखील दिला जाऊ लागला. त्याला कंटाळून  विवाहित महिला माहेरी कर्जत येथे आली. माहेरच्या मंडळींनी बीड येथील जायभाय कुटुंबाची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सुनेला नांदवून घेण्याबाबत कोणतीही तडजोड करीत नसल्याने विवाहितेने कर्जत पोलीस ठाण्यात हुंडाबळी विरोधी कायद्याखाली तक्रार नोंद केली. दरम्यान, पोलिसांच्या विशेष महिला पथकाकडून या दोन्ही कुटूंबियांत सामंजस्य करून देण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो असफल ठरला. अखेर विवाहितेच्या तक्रारीनुसार तिचा पती विशाल जायभाय, सासू सुनंदा जायभाय, सासरे बाळासाहेब जायभाय आणि दिर स्वप्नील जायभाय यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात भादवि कलम 498अ,323,504, 506, 34 खाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक सानप करीत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply