Breaking News

पनवेल : तालुक्यातील उमरोली येथे राहणारे आंब्रे दाम्पत्य पूल ओलांडताना नदीच्या प्रवाहामुळे मोटरसायकलसह वाहून गेले. यामध्ये आदित्य आंब्रे याचा मृतदेह जुई-कामोठे येथील खाडीत गुरुवारी सापडला. आंब्रे कुटुंबीयांवर ओढवलेल्या या संकटामुळे पनवेल तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती अंतर्गत चार लाख रुपयांचा धनादेश सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी त्यांच्या वारसांना देण्यात आला. या वेळी नायब तहसीलदार दत्तात्रेय आदमाने उपस्थित होते.

Check Also

अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन्‌‍ बोलके राहा!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …

Leave a Reply