पनवेल : रामप्रहर वृत्त
गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या दमदार पावसामुळे पनवेल तालुक्यातील देहरंग धरण पूर्णपणे भरले आहे. यामुळे पनवेलकरांचा वर्षभराचा पाणीप्रश्न सुटला आहे.
पनवेल महापालिकेच्या मालकीचे असलेले देहरंग धरण 125 हेक्टर क्षेत्रावर बांधण्यात आले आहे. पनवेल शहरातील वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी हे धरण महत्त्वपूर्ण आहे. या धरणातून पनवेल शहराला रोज 12 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो.
माथेरान डोंगराच्या पायथ्याशी असलेले देहरंग धरण उन्हाळ्यात कोरडे पडले होते, पण आता समाधानकारक पाऊस पडल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, त्याच्या सांडव्यावरून अतिरिक्त पाणी वाहू लागले आहे.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …