Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शाळांमध्ये वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त  – श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील चिखले आणि शिवकर येथील शाळांमध्येे वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि. 17) करण्यात आले होते. तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यतेखाली हा कार्यक्रम झाला.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताच गरीब, गरजू विद्यार्थ्यांना वह्यावाटपाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. त्या अंतर्गत पनवेल तालुक्यातील चिखले येथील विजय आर्मी स्कूल, जिल्हा परिषदेच्या शाळेत, तसेच शिवकरमधील श्री गणपती इंग्लिश मीडियम स्कूल आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले.या कार्यक्रमास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पनवेल तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेष ढवळे, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, चिखले सरपंच नामदेव पाटील, उपसरपंच रवींद्र गडकरी, कोन पंचायत समिती महिला मोर्चा अध्यक्षा शिल्पा म्हात्रे, हुसेन शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी अरुणशेठ भगत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply