पनवेल : वार्ताहर – पर्श्ववुनम सामाजिक संस्था व इंडस्ट्रियल टाऊन इनरव्हिल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कष्टकरी आदिवासीवाडीत 100 रेनकोट व खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी आदिवासीवाडीत बाथरूम बांधून देण्याबाबत नगरसेविका दर्शना भोईर यांनी आश्वासन दिले.
या कार्यक्रमास सरपंच चंद्रकांत भोईर, सदस्य विश्वनाथ गायकवाड, नंदनी आठपाडकर, गुरुबाई राठोड, माधू दोरे, बसंती जैन, किंजल जैन, स्नेहा गांधी, विमल जैन, निलम सोमनी, डॉ. जयश्री पाटील (अध्यक्ष), कल्पना नागावकर, स्वाती कदम, वैशाली म्हात्रे व आदिवासी महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी आदिवासी समाजासाठी करीत असलेल्या कर्तबगार महिलांचा गौरव करून सामान्य समाजासाठी करीत असलेल्या भरीव कामाचे कौतुक केले.