मुंबई ः प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण संस्थेतर्फे पत्रकारितेकडे ओढा असलेल्या बारावी, पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शनिवारी (दि. 20) सायंकाळी 5 वाजता विद्यानगरी कालिना येथील गरवारे व्यावसायिक शिक्षण संस्थेच्या प्रेक्षागारात एक विनाशुल्क पत्रकारिता तोंडओळख कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत संस्थेच्या पत्रकारिता वर्गाचे माजी विद्यार्थी आणि नामवंत पत्रकार मार्गदर्शन करतील. सर्वांनाच या कार्यशाळेचे खुले निमंत्रण आहे.
22 जुलैपासून पत्रकारिता वर्गाचे प्रवेश अर्ज गरवारेमध्ये मिळतील. 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा आणि त्यानंतर तोंडी परीक्षा घेतली जाईल. ऑगस्टमध्ये पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम-मराठी (2019-2020) या शैक्षणिक वर्षाचे वर्ग सुरू होतील, याची सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. मोफत पत्रकारिता वर्गासाठी नावनोंदणी करण्यासाठी नीला उपाध्ये 022-25221686 आणि नम्रता कडू 7977489076 यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी गरवारेच्या ुुु.सळलशवशर्वी.ले.ळप वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.