Breaking News

सिडको सहव्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. नारनवरे

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा

डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार गुरुवारी (दि. 18) सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथे स्वीकारला. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती होण्यापूर्वी डॉ. नारनवरे पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत होते.

सन 2009च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असलेल्या डॉ. नारनवरे यांनी यापूर्वी अमरावती व कोल्हापूर जिल्ह्याचे साहाय्यक जिल्हाधिकारी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला आहे, तसेच टाटा समाज विज्ञान संस्था, तुळजापूर येथे प्रोफेसर म्हणूनही ते कार्यरत आहेत.  उच्चविद्याविभूषित असलेल्या डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एमएस, एमए (लोक प्रशासन), एमपीपी, नेट या पदव्यांसह पीएचडीही प्राप्त केली आहे.   डॉ. नारनवरे यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत काही अभिनव ठरतील अशा योजना व प्रकल्प राबविले. जलसंवर्धन हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून जलयुक्त शिवार योजनेचा त्यांनी राबविलेला पॅटर्न हा ‘उस्मानाबाद पॅटर्न’ म्हणून प्रसिद्ध आहे. काही बदल करून राजस्थान सरकारनेही हा पॅटर्न स्वीकारला. डॉ. नारनवरे यांना 2013मध्ये ‘उत्कृष्ट जिल्हाधिकारी’ पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply