Breaking News

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात नुकताच गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य के. के. म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमात सहाय्यक शिक्षक प्रमोद शेळके, विकास गाढवे, अस्मिता म्हात्रे आणि विणा अमदली हे प्रमुख म्हणून होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त भाषणे करून शिक्षकांप्रति त्यांची भावना व्यक्त केली. 12वी वाणिज्यच्या प्राजक्ता अवधानीने गुरूची महती इंग्रजी भाषेतून सांगितली. सहाय्यक शिक्षिका प्रीतम पाटील यांनी एकलव्याच्या कथेतून गुरुपौर्णिमेबद्दल मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्व शिक्षकवृंदांना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 12वी वाणिज्य शाखेतील सौरभ तळवलकर याने केले. इयत्ता 12वी विज्ञान शाखेतील श्रुती तेलवणे या विद्यार्थिनीने उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला चेअरमन रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, सचिव डॉ. गडदे आदींनी शुभेच्छा दिल्या.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply