पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयामध्ये मंगळवारी (दि. 16) गुरुपौर्णिमेचा विशेष कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सुशीला घरत, भाजप कार्यकर्त्या शोभा पन्हाळे, लक्ष्मी चव्हाण तसेच शिक्षक-पालक संघाचे सदस्य उपस्थित होते. या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात पार पडला. या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमांतर्गत पूर्व प्राथमिक विभागाच्या छोट्या विद्यार्थ्यांनी श्लोक व गोष्टी सादर केल्या. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करून वृक्ष व संगणक हेदेखील आपले गुरू कसे आहेत ते सांगितले. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांचे स्वागत श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक सुभाष मानकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांना गुलाबपुष्प देऊन कृतज्ञता व्यक्त केली. शाळेतील शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचार्यांनी या कार्यक्रमाचे अत्यंत नेटके नियोजन केले होते. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक-पालक संघाचे प्रतिनिधी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम साजरा झाला.