कळंबोली : प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशाचे सुमारे 40 जवान शहीद झाले. त्याला रविवारी (दि. 24) 10 दिवस पूर्ण झाल्यामुळे भारतीय रीतिरिवाज व परंपरेनुसार कळंबोली कॉलनी येथे सामुदायिक मुंडण करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत सेवालाल सामाजिक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास बंजारा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते मधुकर जाठोत, भाजप भटके-विमुक्त मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष बबन बारगजे, देविदास खेडकर, भाजप नेते राजेंद्र बनकर, आबा घुटुकडे, अनिल नाईक, संदीप म्हात्रे, शर्मेश राठोड, आजिनाथ सावंत, बबन पवार, ललित राठोड, बापूराव साबळे, गजानन जाधव, अनिल शिंदे, भगवान जाधव, विलास चव्हाण, दिनेश जाधव, साईनाथ जाधव, नागोराव जाधव, लक्ष्मण राठोड, सुभाष राठोड, माणिक राठोड, संजय राठोड, सचिन राठोड, अनिल चव्हाण, अर्जुन जाधव, सिद्धनाथ जाधव, आकाश देसाई यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.