पनवेल : बातमीदार
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची 22 वाहने बर्याच दिवसांपासून बेवारस स्थितीमध्ये पडून आहेत. या वाहनाच्या मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. शहर पोलीस ठाण्याच्या आवारात बजाज डिस्कव्हर, पल्सर, महिंद्रा सेन्च्युरो, करिझ्मा, हीरो होंडा स्प्लेंडर, लाल कायनेटिक, स्प्लेंडर प्लस, पल्सर काळी, पॅशन प्रो, हीरो होंडा सांगाडा, ग्लेमर, अॅक्टिव्हा, सीडी 100, सुझुकी एफ झेड, अॅक्टिव्हा सफेद व ग्रे रंग अशा 22 गाड्या बेवारस स्थितीत पडून आहेत. या गाड्यांच्या मालकांनी पोलीस निरीक्षक विजय तावडे (9702371058) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.