Breaking News

सारडे विकास मंचतर्फे प्लॅस्टिकमुक्त गाव उपक्रम

उरण : बातमीदार

स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मूलमंत्र अंगीकारून  उरण पूर्व विभागातील सारडे विकास मंचने ‘प्लॅस्टिकमुक्त गाव’चा निर्धार केला आहे. या अंतर्गत नुकताच आवरे गावात उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास राजू मुंबईकर, शिक्षक कौशिक ठाकूर उपस्थित होते. या वेळी सामाजिक संघटना, व्यक्तींना कापडी पिशवीचे वाटप करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थितांचे आभार मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी मानले. या उपक्रमासाठी सारडे विकास मंचबरोबरच गोल्डन जुबली सारडे, सुयश क्लास आवरे, कै. मधुकर ठाकूर प्रतिष्ठान आवरे, जाणता राजा ग्रुप वशेणी, आम्ही पिरकोनकर पिरकोन, कोप्रोली स्वच्छता अभियान कोप्रोली आणि सह्याद्री प्रतिष्ठान उरण यांनी सहकार्य केले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply