पनवल ः वार्ताहर – रोटरी क्लब ऑफ पनवेल व डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रामकृष्ण अॅकॅडमी हरिग्राम, केवाळे, ता. पनवेल येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.
या कॅम्पसाठी दंत विभाग डॉ. रुचा वाळींबे, डॉ.ॠतुजा पाटील, डॉ. भाग्यश्री शहा, डॉ. वंदना ठक्कर, नेत्रविभाग डॉ. रत्नदीप गवळी, नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. रचना तिवारी, डॉ. कौस्तुभ सरवदे या सर्वांच्या मेहनतीने व मार्गदर्शनपर संपन्न झाला. एकूण 460 विद्याथ्यार्र्ंनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी क्लबचे अध्यक्ष रो. सुनील लघाटे, सचिव रो. गणेश साठे, मेडीकल सर्व्हीसचे अरमन नितीन गावंड, पी. आर. ओ. प्रसन्न खेडकर, पटवर्धन रुग्णालयातील स्टाफ, क्लबचे सदस्य आणि वंदना लघाटे, एन. मंजिरी नांदेडकर, शिरिष नांदेडकर, अमर म्हात्रे व अन्य उपस्थित होते.