Breaking News

वंजारवाडी पुलावरील खड्डे भरण्यास सुरुवात

दै. ‘रामप्रहर’च्या वृत्ताने रस्ते विकास महामंडळाला आली जाग

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील पेज नदीवर असलेल्या वंजारवाडी पुलावर रस्ता धोकादायक झाला होता. त्याबाबत दै. रामप्रहर मध्ये वृत्त प्रसिध्द होताच राज्य रस्ते विकास महामंडळाला जाग आली. त्यांनी शुक्रवारी (दि. 24)  वंजारवाडी येथील पुलाची दुरुस्ती सुरु केली.

23डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अभियंत्यांना निवेदन देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी मनसेने त्या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास आक्रमकपणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर कडाव आणि कशेळे या दरम्यान पेज नदीवर वंजारवाडी येथे पूल आहे. त्या पुलावर आणि दोन्ही बाजूला असलेला रस्ता गेली अनेक महिने खराब अवस्थेत आहे. त्याबाबत स्थानिक तरुण कृष्णा जाधव आणि कृष्णा शिंगोळे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. दै. रामप्रहर ने गुरुवारी या पुलाबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर यांनी राज्य रस्ते विकास महामंडळच्या पनवेल कार्यालयात निवेदन दिले होते. त्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने शुक्रवारी  वंजारवाडी येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. रस्त्यावरील खडबडीत भाग काढून टाकण्यात आला असून त्यावर आरएमसी सिमेंट आणून पुलाचा पृष्ठभाग नव्याने दुरुस्त करण्यात आला आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply