Thursday , March 23 2023
Breaking News

कार अपघातात नवरदेवाच्या भावासह चार ठार

बीड ः प्रतिनिधी

लग्नसोहळ्यासाठी कपिलधारकडे जाणारी कार आणि उस्मानाबादकडून येणार्‍या ट्रकचा समोरासमोर अपघात होऊन नवरदेवाच्या भावासह चार जण ठार झाले. रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडपासून जवळच असलेल्या पाली परिसरातील बिंदुसरा तलावानजीक ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार अंबाजोगाई तालुक्यातील बोरी सावरगाव येथील तेजस गुजर याचा भाऊ कुंभेश याचे कपिलधार येथे लग्न होते. त्यानिमित्त तेजससोबत मेहुणे सौरभ अरुण लोहारे (रा. लातूर), मंगेश मल्लिकार्जुन कुंकूकरी (ता. बार्शी, सोलापूर), अक्षय रामलिंग गाढवे (रा. धानोरा, ता. अंबाजोगाई) तिघे बीड येथे काही कामानिमित्त आले होते. बीडकडून कपिलधारकडे कारमधून जात असताना बिंदुसरा तलावानजीक समोरून आलेल्या ट्रक आणि कारचा समोरासमोर अपघात झाला. यात तेजस गुजर, सौरभ लोहारे, मंगेश कुंकूकरी, अक्षय गाडवे हे ठार झाले, तर कारमधील शुभम दत्तात्रय उंबरे (रा. वाणेवाडी, ता. उस्मानाबाद) हा जखमी झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू  केले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. मयतांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला, तर या घटनेची माहिती मिळताच नवरदेवाला मानसिक धक्का बसल्याचे समजते.

Check Also

पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागताचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत लहान मुलांसह महिला, …

Leave a Reply