पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा निवड चाचणीचा बक्षीस समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. 12) आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत सिद्धार्थ दास याने प्रथम क्रमांक पटकावला. या वेळी मान्यवरांच्या सत्कार सोहळाही झाला.
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हा स्तरीय स्पर्धा, निवड चाचणीचा बक्षीस वितरण समारंभ आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन उपाध्यक्ष प्रदीप गंधे यांना मेजर ध्यानचंद पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तसेच सचिव सुंदर शेट्टी यांना बीडब्लूएफ पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन रविवारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये करण्यात आले होेते.
या सोहळ्याला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे चेअरमन तथा सभागृह नेते परेश ठाकूर, बॅडमिंटन रायगड असोसिएशनचे सचिव डेविड अल्वारीस, रवींद्र भगत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या बॅडमिंटन स्पर्धेत सिद्धार्थ दास याने प्रथम क्रमांक व निशांत गलांडे याने द्वितीय क्रमांक पटकवला असून सर्व विजेत्या स्पर्धकांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …