Breaking News

ओबीसींच्या शिक्षणासाठी महाज्योती योजना तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी

पनवेल ः प्रतिनिधी

बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर आधारित भटक्या विमुक्त आणि ओबीसी समाजाच्या शिक्षणासाठी जाहीर झालेली महाज्योती योजना तत्काळ कार्यान्वित करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष बबन बारगजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. भटका-विमुक्त समाज हा वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेला समाज आहे. त्याचबरोबर इतर मागासवर्गीयांचीही हीच स्थिती आहे. अनेक वर्षे जंगलामध्ये भटकत राहणारा समूह हा मागील काही वर्षांमध्ये हळूहळू स्थिर होत आहे, मात्र या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सातत्याने होणारे दुर्लक्ष आणि त्याचा परिणाम म्हणून हा समाज आजही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. याचे कारण समुदायातील लोकांची उपजीविका ही ऊसतोड कामगार, शेती कामगार, बांधकाम मजूर, शेतमजूर किंवा इतरांच्या शेतावर सालगडी म्हणून राहणे आदींवर अवलंबून असल्याने त्यांच्या दोन वेळच्या पोटापाण्याचा प्रश्नही सुटलेला नाही. तरी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा, असे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भटके-विमुक्त, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग यांना महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या प्रमाणात संशोधक छात्रवृत्ती कमीत कमी 1500 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी देण्यात यावी, भटके-विमुक्त, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या तिन्ही समूहांना समान पातळीवर स्वतंत्र जागा आरक्षित ठेवाव्यात, अशीही मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply