Breaking News

भाजप खासदाराच्या घरावर बॉम्बहल्ला, अज्ञातांनी केला अंदाधुंद गोळीबार

कोलकाता : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीपासून पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात सुरू असलेली राजकीय लढाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दरम्यान, या विवादाचे पर्यावसान हिंसाचारात होत असून, नुकत्याच झालेल्या ताज्या घटनेत उत्तर 24 परगणा जिल्ह्यात भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानावर मोठा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी अर्जुन सिंह यांच्या घरावर बॉम्बहल्ला केला, तसेच हल्लेखोरांनी सिंह यांच्या घराच्या दिशेने गोळीबारही केला. बेराकपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार असलेल्या अर्जुन सिंह यांच्या कुटुंबीयांनी तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.

हल्ल्याच्या घटनेनंतर उत्तर 24 परगणा जिल्ह्यात जगतदल ठाण्याच्या जवळ असलेल्या अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, तसेच अर्जुन सिंह यांचा मुलगा सौरभ सिंह यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे. या जीवघेण्या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप अर्जुन सिंग यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसविरोधाच जोरदार आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, हा गोळीबार झाला तेव्हा भाजप खासदार अर्जुन सिंह हे घरी नव्हते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply