Breaking News

कमी शिकलेलेही वाहन चांगले चालवतात : गडकरी

सिडको कन्व्हेन्शन अ‍ॅण्ड एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘प्रवास 2019’

नवी मुंबई : प्रतिनिधी

सुशिक्षित वाहनचालकांपेक्षा कमी शिकलेले वाहन चालकही चांगले वाहन चालवितात, असे निदर्शनास आल्याने वाहनचालक परवान्यासाठीची शिक्षणाची अट रद्द केल्याचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (दि. 27) येथे स्पष्ट केले. वाशी येथील सिडको कन्व्हेन्शन अ‍ॅण्ड एक्सिबिशन सेंटरमध्ये ‘प्रवास 2019’ या इंडिया इंटरनॅशनल बस अ‍ॅण्ड कार ट्रॅव्हलचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (दि. 27) भेट देऊन पाहणी दिली. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. या प्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी मार्गदर्शनपर भाषणात नितीन गडकरी बोलत होते. राष्ट्रीय वाहतूक धोरणात बदल करण्यात आला असून त्याचा फायदा दहावीपेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या नागरिकांना होणार असून देशात कमतरता असलेल्या 25 लाख चालकांची उणीव भरून निघणार आहे, असेही गडकरी म्हणाले. या तीन दिवसीय प्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, लवकरच नवीन वाहनाच्या नोंदणीसाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयामध्ये तुमचे वाहन घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. कारण आता ग्राहक हे काम ऑनलाईन करू शकतील, असेही नितीन गडकरी यांनी सांंगितले. प्रदूषण कमी करण्यासाठी देशात यापुढे इलेक्ट्रिक, बायो-सीएनजी आणि इथेनॉल या इंधन वापराला प्राधान्य देण्यात येणार आहे. नागपूर परिसरात

बायो-सीएनजीचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे विदर्भातील सहा जिल्हे येत्या काही वर्षांत डिझेलमुक्त होणार आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धरतीवर मुंबई-दिल्ली हा एक्स्प्रेस वे तयार करण्यात येणार आहे, मात्र हा मार्ग इलेक्ट्रिक असणार आहे. त्यामुळे इंधन आणि वेळेत मोठी बचत होणार असून हे अंतर 12 तासांमध्ये वाहनांना पार करता येणार आहे, असेही गडकरी यांनी सांगितले. प्रवास, अशोक लेलँड आणि बी.ओ.सी.आयच्या वतीने इंडिया इंटरनॅशनल बस अ‍ॅण्ड कार ट्रॅव्हल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रदर्शन वाशी येथील सिडको कन्व्हेन्शन अ‍ॅण्ड एक्झिबिशन सेंटरमध्ये झाले. या वेळी टुर्स मालकांना  सन्मानचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाला माजी खासदार किरीट सोमय्या, के. टी. राजशेकरा, प्रसन्न पटवर्धन, ए. के. ससींनद्रन, अमदार मंदा म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply