खालापूर : प्रतिनिधी
खोपोली नगर परिषद कर्मचार्यांच्या पथकाने शहरातील दुकानांवर धाडी टाकून बंदी घातलेल्या प्लास्टिकचा मोठा साठा जप्त केला. खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांच्या नेतृत्वाखालील गौतम भगणे, अनिल डोहळे, संतोष कांबळे, प्रसाद ढवळे, महेश सोळंकी, हरिश्चंद्र पवार, अनिल पवार, अनिल इंगळे, गुणाजी गायकवाड, विठोबा म्हात्रे, किशोर बांदिवडेकर या नगर परिषद कर्मचार्यांच्या पथकाने खोपोली बाजारपेठेतील पूजा सुपर मार्केट, शिवशक्ती डेरी, त्रिमूर्ती स्वीट्स, गुरुकृपा अगरबत्ती आदी दुकानांवर धाडी टाकून सुमारे 12 हजार रुपये किमतीचे बंदी घातलेले प्लास्टिक जप्त केले, तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
नगर परिषदेने प्लास्टिकबंदीचा ध्यास घेतला असून यापुढे बंदी असलेले प्लास्टिक वापरणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. शहरात प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात आले असून, या संकलन केंद्रात नागरिक व व्यापार्यांनी आपल्याकडील प्लास्टिक जमा करावे.
-गणेश शेट्ये, मुख्याधिकारी, खोपोली नगर परिषद