Tuesday , March 28 2023
Breaking News

दिल्लीचा कोलकातावर ‘सुपर’ विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

दिल्लीच्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवर दिल्ली आणि कोलकाता यांच्यात शनिवारी (दि. 30) झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून दिल्लीच्या संघाने विजय मिळवला. 20 षटकांत सामना अनिर्णित राहिल्याने सुपर षटक खेळवण्यात आली. या वेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करीत एका षटकात 1 बाद 10 धावा केल्या आणि कोलकाताला 11 धावांचे आव्हान दिले, पण कोलकाताला केवळ 7 धावाच जमवता आल्या आणि दिल्लीने शानदार विजय साकारला.

दिल्लीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रसलच्या 62 आणि कार्तिकच्या 50 धावा यांच्या जोरावर कोलकाताने 20 षटकांत 8 बाद 185 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी 186 धावांची गरज होती. प्रत्युत्तरादाखल सलामीवीर शिखर धवन लवकर बाद झाला. त्यानंतर सलामीवीर पृथ्वी शॉ ने 30 चेंडूंत अर्धशतक ठोकले, मात्र दुसरीकडे कर्णधार श्रेयस अय्यर झेलबाद झाला. त्याने 32 चेंडूत 43 धावांची खेळी केली. पृथ्वीच्या शानदार धमाक्यामुळे सामना रंगतदार स्थितीत आला होता, मात्र या वेळी आधी ऋषभ पंत बाद झाला. मग लगेचच पृथ्वी 99 धावांवर बाद झाला. त्याचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याने 55 चेंडूंच्या खेळीत 12 चौकार आणि 3 षटकार मारले. प्रथमच संधी मिळालेला हनुमा विहारी लवकर झेलबाद झाला. शेवटच्या चेंडूवर 2 धावा हव्या असताना दुसरी धाव घेताना दिल्लीचा फलंदाज धावबाद झाला.

त्याआधी, कोलकात्याची सुरुवातही खराब झाली. मराठमोळा निखिल नाईक, अनुभवी फलंदाज रॉबिन, ख्रिस लिन, नितीश राणा हे झटपट बाद झाले. खेळपट्टीवर स्थिरावलेला शुभमन गिल धावचीत झाला. त्यामुळे 61 धावांत कोलकात्याच्या निम्मा संघ माघारी परतला होता. 61 धावांत 5 गडी बाद झाल्याने कोलकात्याची अवस्था बिकट होती, पण कर्णधार दिनेश कार्तिक आणि धडाकेबाज आंद्रे रसलची फटकेबाजी यांच्यामुळे 14 षटकांत कोलकाताने शतकी मजल मारली. अर्धशतक पूर्ण करून मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणारा आंद्रे रसल 62 धावांवर माघारी परतला. त्याने केवळ 28 चेंडूंत ही खेळी केली. यात 4 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. दिनेश कार्तिकने कर्णधारपदाला साजेशी खेळी करीत 35 चेंडूत अर्धशतक लगावले, मात्र अर्धशतकानंतर लगेचच कार्तिक झेलबाद झाला.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply