Breaking News

अतिवृष्टीमुळे अष्टमीत घर कोसळले

रोहे ः प्रतिनिधी

शहरात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रोहा अष्टमी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे अष्टमी येथील महिलेचे कौलारू घर शनिवारी (दि. 27) रात्री कोसळले. अष्टमी येथे शनिवारी रात्री जोरदार पाऊस पडत होता. कुंडलिका नदीला पूर आला होता. यादरम्यान रात्री अष्टमी येथील मराठा आळीमधील प्रेमा मारुती खैरे (75) यांचे कौलारू घर शनिवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास कोसळले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply