अलिबाग : प्रतिनिधी
तालुक्यातील रेवस बंदराकडे जाणार रस्ता बेवारस असल्यासारखा दुर्लक्षित राहिला आहे. नवखार ते रेवस बंदरपर्यंतच्या रस्त्याची प्रचंड वाताहत झाली आहे.
अलिबाग तालुक्यातील रेवस हे शंभर वर्षाहून अधिक जुने बंदर आहे. रेवस बंदरावर जाणार्या रस्त्याकडे गेली दोन वर्षे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. नवखारपासून रेवस बंदरापर्यंतचा रस्ता जागोजागी अक्षरशः फाटला आहे. या खड्ड्यातून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. या खड्ड्यातून वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.