Breaking News

बापाने केले मुलाचे अपहरण; उरण पोलीस आरोपीच्या शोधात

उरण ः प्रतिनिधी

उरण तालुक्यातील आवरे गावात आईच्या मृत्यूनंतर आजोबांकडे राहणार्‍या पाच वर्षांच्या तनुश विशाल तर्लोस्कर याचे त्याच्या वडिलांनी व आत्याने आपहरण केले असून, याबाबत त्यांच्या विरोधात तनुशचे आजोबा शांताराम गावंड (78) यांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार आवरे येथील शांताराम गावंड व इंदिरा गावंड यांची मुलगी प्रियांका गावंड हिचा दिवा येथील विशाल रमेश तर्लोस्कर याच्यासोबत 23 मे 2013 रोजी विवाह झाला होता. परंतु दि.18 जुलै 2017 रोजी तिचा मृत्यू झाल्यानंतर विशाल रमेश तर्लोस्कर याला कल्याण पोलिसांनी अटक करून त्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. या गुन्ह्यातून त्याला जमीन मिळाला होता. मात्र त्याच्या विरोधात कल्याण येथील जिल्हा सत्र न्यायालयात कलम 302खाली पत्नीचा खून केल्याप्रकरणी युक्तिवाद सुरू आहे.

त्यानंतर त्याने मुलाचा ताबा मिळविण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला असता न्यायालयाने त्याबाबत  दि. 5 एप्रिल 2019 रोजी निकाल दिला असून तनुशचा ताबा आजोबांकडेच ठेवून वडिलांना महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या रविवारी सकाळी 10 ते दु. 4 वाजेपर्यंत भेटण्याची परवानगी दिली आहे. परंतु दि. 21जुुुलै 2019 रोजी मुलाला भेटण्यास मिळाले नसल्याच्या रागात विशाल तर्लोस्कर याने शांताराम गावंड यांच्या घरात घुसून तोडफोड केली.

त्यानंतर दि. 23 जुलै 2019 रोजी दुपारी आवरे येथील कोमल सुजित म्हात्रे यांच्या क्लासमधून विशाल तर्लोस्कर व त्याची बहीण निता पवार यांनी जबरदस्तीने तनुशला तेथील क्लासमधील शिक्षिकेने आजोबांच्या अपरोक्ष नेण्यास विरोध केला असताना देखील तेथून पळवून नेले असून, मुलाचे आजोबा शांताराम गावंड (रा. आवरे, ता. उरण) यांनी नातवास पळवून नेल्याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply