Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धा पॉलिसी, सुरक्षा किटचे वाटप

धाटाव : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा तालुक्यातील कोरोना योद्ध्यांना युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्या माध्यमातून विमा पॉलिसी, तर धाटाव विभागात नाभिक सामाजातील बांधवांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोठेही बॅनरबाजी करू नये आणि त्याऐवजी लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचेे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांचे सहकारी युवा नेते अमित घाग यांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या संकटकाळात कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असलेले पत्रकार, सफाई कामगार, असंघटित कामगार  आदींची पॉलिसी काढून मदतीचा हात पुढे केला. प्रगल्भ विचारसरणी असलेल्यांना  आवडती पुस्तके व घरगुती आयुर्वेदिक उपचार करण्यासाठीही पुस्तके उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे धाटाव विभागातील नाभिक बांधवांना सुरक्षा किट वाटण्यात आले.

या उपक्रमांवेळी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नरेश कोकरे, रोह्याचे माजी नगराध्यक्ष संजय कोनकर, तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, सरचिटणीस दीपक भगत, विभाग अध्यक्ष कृष्णा बामणे, रोठ बुद्रूक ग्रामपंचायतीचे सदस्य राजेश डाके, ग्राहक संरक्षण मंच तालुकाध्यक्ष विलास डाके, सह्याद्री पतसंस्थचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य व महिला मोर्चा अध्यक्ष श्रद्धा घाग, रोहा अध्यक्ष स्वप्नाली धनवी, भरत महाडिक, रूपेश सुतार, किरण भगत, प्रशांत जाधव, महादेव माने, स्वप्नील वाळंज, श्रीकांत जगंम, थिटे,  निलेश धुमाळ, सार्थक जाधव आदी सोशल डिस्टन्सिंग पाळून उपस्थित होते.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply