रेवदंडा : फणसाड अभयारण्याला लागूनच असलेल्या ताराबंदर गावातील प्राथमिक मराठी शाळेत रविवारी (दि. 28) सकाळी आठ वाजता नऊ फुट लांबीचा अजगर ग्रामस्थांच्या नजरेस पडला. शाळेच्या पाठीमागील बाजूला या भल्यामोठ्या अजगराने ठाण मांडले होते. या अजगरास पाहून ग्रामस्थांची धावपळ उडाली. त्यांनी लागलीच रेवदंडा येथील संर्पमित्र दुशांत झावरे व सुरज धुमाळ यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून बोलाविले. त्यांनी लागलीच घटनास्थळी येऊन या अजगरास पकडले व फणसाड अभयारण्यात सोडून दिले.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …