पेण : प्रतिनिधी – ग्रुप ग्रामपंचायत वडखळच्या वतीने सरपंच राजेश मोकल यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत हद्दीत नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम व जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने विविध वास्तूंचे वाटप व हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धरमतर पोर्ट जेट्टीचे अधिकारी अनुराग भगौळीवाळ, सी. एस. आर. व्यवस्थापक सुशील पाटील, सरपंच राजेश मोकल उपसरपंच रवींद्र म्हात्रे, माजी जि. प. सदस्य संजय जांभळे, माजी पं. स. सदस्या पूजा मोकल, ग्रा.पं. सदस्य मिलिंद मोकल, योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर फंडातून वडखळ जयकिसान विद्यामंदिर येथे लावण्यात आलेल्या हायमास्ट दिव्याचे उद्घाटन अनुराग भगौळीवाळ यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच जॉगिंग ट्रकचे बांधकाम उद्घाटन व अंगणवाडी बाल उद्यानात खेळणी साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी नितीन धोदरे, सदस्य जगदीश म्हात्रे, विजय म्हात्रे, योगिता मोकल, अनिता म्हात्रे, प्रमिला म्हात्रे, आशा म्हात्रे, संगीता भोईर यांच्यासह जयकिसान विद्यामंदिरचे मुख्याध्यापक व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.