Breaking News

‘ग्राहकांना चांगल्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी महावितरण कटिबद्ध’

पनवेल ः वार्ताहर

पनवेल शहर व परिसरातील वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करणे तसेच त्यांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी महावितरण कंपनी कटिबद्ध असून यासाठी वेगवेगळ्या योजना तसेच सबस्टेशनच्या माध्यमातून वीजपुरवठा कसा अखंडित होईल याकडे लक्ष असल्याचे पनवेल शहर महावितरण कंपनीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांनी वीज वितरण कंपनीमार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची व उपक्रमांची माहिती देताना सांगितले.

ग्राहकांच्या अनेक तक्रारी वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून असतात. त्यामध्ये प्रामुख्याने वेळोवेळी वीज जाणे, विजेचे बिल जास्त येणे, मीटर रिडींग, तक्रारीला प्रतिसाद न देणे, वीज लॉसेस यांसारख्या असंख्य प्रश्नांना यापूर्वी पनवेलकरांना सामोरे जावे लागत होते, परंतु गेल्या दोन वर्षांपासून वीज वितरण कंपनीचा कारभार सुरळीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून त्यासाठी दोन सबस्टेशनचे काम सुरू आहे. त्यामुळे वारंवार वीज जाण्याचे प्रकार सध्या कमी झाले आहेत.  ग्राहकांच्या तक्रारीचे जास्तीत जास्त निवारण तातडीने करण्यासाठी कर्मचारी कटिबद्ध आहेत. त्यादृष्टीने कर्मचार्‍यांना आता विविध भागासाठी मोबाइल सुविधाही देण्यात आली आहे. वीज ग्राहकांच्या कोणत्याही तक्रारी असल्यास त्यांनी संबंधित फोन नंबरवर संपर्क साधल्यास तत्काळ तक्रारीचे निवारण करण्यात येईल. वीज ग्राहकांनी वीजचोेरी थांबवावी, वीजचोरी कुठे होत असल्यास तत्काळ त्यांनी वीज वितरण कंपनीशी संपर्क साधून त्याची माहिती द्यावी आणि शासनाचा महसूल वाचवावा, असे आवाहन या वेळी जयदीप नानोटे यांनी केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply