Breaking News

जेएनपीटीने केला इंटर टर्मिनल रेल हँडलिंग ऑपरेशन सामंजस्य करार

उरण ः प्रतिनिधी

जेएनपीटीने आयात-निर्यात समुदायासाठी अधिक गरजेचा असलेला इंटर टर्मिनल रेल हँडलिंग ऑपरेशनसाठी जेएनपीटी व इतर टर्मिनलमध्ये सामंजस्य करार करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आयात-निर्यात मालाच्या एकत्रित रेल कंटेनरची हाताळणी करण्यासाठी 2007मध्ये जेएनपीटी, एनएसआयसीटी आणि जीटीआयमध्ये इंटर टर्मिनल रेल हँडलिंग ऑपरेशनसंदर्भात सामंजस्य करार झाला होता, तथापि एनएसआयसीटी आणि बीएमसीटी या दोन नवीन टर्मिनलच्या येण्याने हा सामंजस्य करार निरर्थक ठरला होता. तसेच जेएनपीटी, एनएसआयसीटी आणि जीटीआय टर्मिनलच्या रेल्वे लाइन्स एकमेकांपासून जवळ असून बीएमसीटी रेल्वे लाइनचे अंतर या तीन टर्मिनलपासून साधारण पाच किमीवर आहे. त्यामुळे बीएमसीटी आणि इतर टर्मिनल्समधील मोठ्या अंतरामुळे इंटर टर्मिनल रेल हँडलिंग ऑपरेशन सामंजस्य कराराच्या उपक्रमास मोठा अडथळा ठरत होता. त्यासाठी नवीन इंटर टर्मिनल रेल हँडलिंग ऑपरेशन सामंजस्य कराराची आखणी करून त्यास सर्व टर्मिनलची मान्यता प्राप्त झाली असून त्याची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. यामुळे एकूणच व्यापारास गती मिळण्यास मदत होऊन कार्यक्षमता वाढेल. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी यामध्ये जातीने लक्ष दिले, तसेच आयटीआरएचओ करारामुळे सर्व भागधारकांना विशेषत: जेएनपीटीच्या ग्राहकांना आणि व्यापाराला मोठा फायदा होईल याची त्यांना जाणीव झाली. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply