Breaking News

मांसाहारावर ताव मारून गटारी साजरी

अलिबाग : प्रतिनिधी

श्रावण मासाची पूर्वसंध्या म्हणजे दीप अमावस्या. तिचा अपभ्रंश गटारी अमावस्या म्हणून झाला. तिखटावर म्हणजेच मांसाहारावर ताव मारून बुधवारी (दि. 31) सर्वत्र गटारी साजरी झाली. अर्थात मानवी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी शेकडो बकरे आणि कोंबड्यांचा बळी गेला. गुरुवारी दुपारपर्यंत अमावस्या असल्याने बुधवार हा हक्काचा मांसाहाराचा वार ठरला. त्यामुळे मटणाच्या दुकानांसमोर तोबा गर्दी पाहायला मिळाली. सुटीचा वार नसल्याने काहींनी आदल्या रात्रीच सोय केली होती; तर काही खवय्यांनी सकाळीच मच्छी, मटण विक्रेत्यांच्या दुकानात हजेरी लावून त्यांची बोहनी केली. एकीकडे कोंबडी आणि बोकडाच्या मटणाचे दर वाढल्याची ओरड होत असली तरी मटण खरेदी करणार्‍यांच्या संख्येत कमतरता जाणवली नाही. पूर्वी श्रावणात ग्रामीण भागात मटणाची दुकाने बंद असत, पण आता वर्षाच्या बाराही महिने मटण विक्रेते खवय्यांच्या सेवेसाठी सज्ज असतात. त्यामुळे हरदिन गटारी असेच पाहायला मिळते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply