Breaking News

टीम इंडियाकडून निषेध अन् श्रद्धांजली

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था

पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात काळ्या फिती बांधून खेळ केला, तसेच मैदानावर मौन पळून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. या हल्ल्यानंतर भारताने विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी होत आहे. विशाखापट्टणम येथील सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहुल पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली, तसेच टीम इंडियाने काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेधही नोंदविला.

…अन् विराट प्रेक्षकांवर रागावला 

शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांचा कल्ला सुरूच होता. त्यांच्या या कृत्याचा कोहलीला राग आला आणि त्याने ओठांवर बोट ठेवून दर्शकांना शांत राहण्याच्या सूचना केल्या. शहिदांसाठी दोन मिनिटे स्तब्धता पाळली जात नसल्याने तो
रागावल्याचे दिसून आले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply