मुरूड : प्रतिनिधी – येथील वृत्तपत्र छायाचित्रकार सुधीर नाझरे यांच्या छायाचित्राला ग्रँड इंटरनॅशनल सर्कीट 2020 या स्पर्धेत आयजीसीचा हॉनॉर्बल मेन्शन मेडलने सन्मानित करण्यात येणार आहे. याबद्दल नाझरे यांचे अभिनंदन होत आहे.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 22 देशांचे 400 छायाचित्रकार सहभागी झाले होते, तर त्यांच्या 2200 छायाचित्रांचा समावेश होता. यात सुधीर नाझरे यांच्या 22 छायाचित्रांना एक्सेप्टन्स मिळाला व एका छायाचित्राला मेडल प्राप्त झाले आहे. हे छायाचित्र पट्टणकोडली येथील हळदी महोत्सवातील आहे. इंडियन ग्रँड इंटरनॅशनल सर्कीट स्पर्धेतून निवडलेल्या 72 चित्रांचे प्रदर्शन कोलकाता येथे 20 मे रोजी भरविण्यात येणार असून, 30 जूनला बक्षीस वितरण सोहळा होणार आहे.