Breaking News

अरे बापरे..! टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी 2000 अर्ज

मुंबई : प्रतिनिधी

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले होते. मंगळवारी या पदांसाठीची अर्ज करण्याची मुदत संपली असून रवी शास्त्री यांच्या पदावर दावा सांगण्यासाठी पाच जणांचे अर्ज आले आहेत. मुख्य प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी ही कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय सल्लागार समितीकडे असेल आणि या प्रक्रियेत कोहलीचे मत घेतले जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे, पण कॅप्टन विराट कोहलीने या पदासाठी रवी शास्त्रींच्या पारड्यात वजन टाकल्याने निवड प्रक्रियेत नवे वळण येण्याची चिन्हे आहेत. सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार मुख्य प्रशिक्षकपदासाठी जवळपास 2000 अर्ज आले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार या पदासाठी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांच्यासह न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन, भारताचा माजी खेळाडू रॉबीन सिंग आणि भारताचे माजी व्यवस्थापक आणि झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत हे प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. त्याशिवाय भारताचे माजी कसोटीपटू प्रवीण आम्रे यांनीही फलंदाजी प्रशिक्षक, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जाँटी र्‍होड्सने क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले आहेत. महेला जयवर्धनेने आतापर्यंत अर्ज न केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply