Breaking News

पनवेलच्या पाडा मोहल्ल्यात साफसफाई

नगसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहरातील पाडा मोहल्ल्यात बरेच दिवस झाले साफसफाई व्यवस्थित होत नव्हती. त्याबद्दल तेथील नागरिकांनी ही समस्या नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे मांडली. त्यांनी त्वरित महानगरपालिका अधिकार्‍यांशी संपर्क साधून पाडा मोहल्यात सफाई करून घेण्यास सांगितले.

महानगरपालिका सफाई विभागाने तक्रारीची दखल घेत पाडा मोहल्यात साफसफाई करून घेतली. आपल्या प्रभागातील प्रत्येक विभागात जातीने लक्ष घालून समस्यांचे निरसरण करून घेणे हे नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या दिनचर्याचा भाग आहे. त्याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply