Breaking News

‘जयपूर’ची हॅट्ट्रिक

मुंबई : प्रतिनिधी

पहिल्या प्रो-कबड्डी लीग मोसमाचा अपवाद वगळता ज्या जयपूर पिंक पँथर्स संघाला कामगिरीत सातत्य राखता येत नव्हते, त्या जयपूर संघाने यंदाच्या मोसमाला दणक्यात सुरुवात केली

आहे. बुधवारी (दि. 31) मुंबईतील वरळी येथील एनएससीआय बंदिस्त क्रीडा संकुलात पार पडलेल्या प्रो-कबड्डीच्या साखळी लढतीत त्यांनी हरियाणा स्टीलर्सचा 37-21 असा सहज पराभव केला.

चढाईची भिस्त दीपक हुडा सांभाळत असताना संदीप धुल, विशाल, सुनील सिद्धगवाली, अमित हुडा यांनी बचाव मजबूत ठेवत जयपूरच्या विजयात पकडी 14 गुणांची कमाई केली. चढाईत दीपक हुडाने 23 चढायांत 14 गुणांची कमाई केली. संपूर्ण लढतीत हरियाणा संघाला फक्त एकदाच त्याची पकड करणे जमले, मात्र जयपूरला फक्त दीपकवर अवलंबून राहणे परवडणारे नाही. ही प्रदीर्घ लीग असल्याने आठ चढायांमध्ये फक्त एक गुण पटकावणार्‍या दीपक नरवालने वेळीच खेळ उंचावत दीपक हुडावरील ओझे हलके करावे लागेल. हरियाणा स्टीलर्सकडून विनयने नऊ चढायांत सहा गुणांची कमाई केली एवढेच. संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू धर्मराज चेरलाथनने केलेल्या चारही पकडी फसल्या. वाढत्या वयाचा परिणाम त्याच्या खेळात पावलोपावली दिसत आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply