Breaking News

बास्केटबॉल निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

नागोठणे : प्रतिनिधी

रायगड जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या वतीने रविवार दि. 4 ऑगस्ट रोजी सबज्युनिअर व ज्युनिअर रायगड जिल्हा बास्केटबॉल निवड चाचणीचे आयोजन गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, चौक, ता. खालापूर येथे होत आहे. या निवड चाचणीतून निवडलेला संघ दि. 17 ते 23 ऑगस्ट रोजी नागपूर येथे होणार्‍या सबज्युनिअर, ज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. सबज्युनिअरसाठी 1 जानेवारी 2006, तर ज्युनिअरसाठी 1 जानेवारी 2000नंतर जन्म असलेल्या इच्छुक मुले, मुली, संघ, शाळा, क्लबच्या खेळाडूंना सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी संदीप गुरव (9960702510), अमित थिटे (9765162614), जगदिश मर्जे (9270087778) येथे संपर्क साधावा.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply